महाडीबीटी कांदाचाळ अनुदान योजना 2023 | 50 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम.
मित्रांनो या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की, अनुदानित कांदाचाळ साठी कसा अर्ज करायचा आहे, आणि त्याचबरोबर यासाठी कोणते शेतकरी पात्र असेल आणि कांदाचाळ साठी किती रुपये अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो ही पोस्ट नक्की वाचा.
योजनेचा उद्देश
मित्रांनो कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे आणि शेतकरी कांदा ठेवण्यासाठी प्रामुख्याने दगडाची किंवा बांबू पाचट वापरून चाळ तयार करून त्यामध्ये कांदा साठवण करीत असतात.
परंतु बऱ्याचदा पावसामुळे कांदा खराब होतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील विपरीत परिणाम होतो. यामुळे कांदा चाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधल्यास त्याची गुणवत्ता राखली जाऊ शकते, यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
पात्रता
- ७/१२, ८अ वरती शेतकऱ्याची नावे नोंद असावी.
- सातबारा वरती कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
कांदाचाळ साठी अनुदान किती ?
५ MT,१० MT,१५ MT,२० MT आणि २५ MT क्षमतेच्या कांदा चाळ बांधणी प्रमाणे अनुदान असेल. (३५०० रु. प्रति. मे.टन) (टीप : अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो.)
या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकेल ?
- शेतकऱ्यांचा गट.
- स्वयं सहाय्यता गट.
- शेतकरी महिला गट.
- शेतकऱ्यांचे उत्पादक संघ.
- नोंदणीकृत शेती संबंधी संस्था.
- सहकारी पणन संघ.
- शेतकरी सहकारी संस्था.
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- ८अ
- आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक
- आधार कार्ड
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र इ.
अर्ज कसा करायचा ?
मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Home/Index या वेबसाइट ला भेट द्या .
किंवा येथे क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा