नमो शेतकरी महासन्मान निधि योजना | पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ?

 
 
 आता शेतकरी बांधवांना वर्षाला मिळणार 12,000 रुपये. 😃 👇

 

नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम, 🙏

     मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दि. 9 मार्च 2023 रोजी सादर झालेला आहे, आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेले आहेत, आणि त्यापैकी एक म्हणजेच,

         👉 नमो शेतकरी महा-सन्माननिधी योजना 👈

 

प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार.

केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार.

1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार.

या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार.

 

मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की, केंद्र सरकार पीएम-किसान योजनेतून शेतकर्‍यांना वर्षाला 6000 रुपये देत असते. आणि त्याच बरोबर आता राज्य सरकार पण नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेतून तेवढेच म्हणजे 6000 रुपये प्रती शेतकरी वर्षाला देणार आहे.

 केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार 6000 + 6000 = 12000 रु. होतील.


शेतकरी पात्रता काय ?   

तर मित्रांनो या योजनेची सध्या फक्त घोषणा झाली आहे अजून जीआर म्हणजेच शासन निर्णय येणे बाकी आहे. लवकरच या योजनेचा जीआर येईल आणि यासाठी काय पात्रता असेल लवकरच याबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर मी इथे  ती माहिती Add करेल. 

माझ्यामते ज्या शेतकर्‍यांना पीएम-किसान योजनेचा हप्ता येतो ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील .  

 

ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

मित्रांनो नमो शेतकरी महा-सन्मान निधि योजनेची सध्या फक्त घोषणा झाली आहे. अजून या योजनेचा जीआर येणे बाकी आहे, त्यामुळे ऑनलाइन नोंदणी नेमकी कोणत्या Website वर करायची हे अजून अस्पष्ट आहे. लवकरच माहिती मिळेल. 


 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

New Driving License Apply Online Maharashtra 2023 | लर्निंग लायसेंस ऑनलाईन कसे काढावे 2023 | How to apply for learning license online maharashtra 2023

स्वतः पीक विमा कसा भरावा ? Pik vima Kasa Bharava 2024 | Pikvima Pik Pera 2024 | Pik vima form online 2024