प्रधानमंत्री पीकविमा खरीप 2022 योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ!
🔴*अत्यंत महत्त्वाचे*🔴 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१जुलै २०२२ असा होता. दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे, केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत नमूद केल्यानुसार आता *विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे.* कृपया याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, ही विनंती. 🙏 विनयकुमार आवटे , मुख्य सांखिक, म. रा.पुणे १